यावर्षीपासून सर्व शाळांच्या सोयीसाठी प्रत्येक इयत्तेच्या परीक्षा फॉर्मची एकच प्रत अचूक व सुवाच्च अक्षरात लिहावी व त्याची एक झेरॉक्स प्रत संघटनेच्या कार्यालयात जमा करावी. ज्यामुळे प्रमाणपत्रामध्ये नावे लिहिताना चुका टाळता येतील.
विद्यार्थी-विद्यार्थिनी यांची नावे एकत्र लिहावीत. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या नावापूर्वी “कुमार” व विद्यार्थिनींच्या नावापूर्वी ” कुमारी” लिहिणे आवश्यक आहे. परीक्षेस बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची नावे एकाच वेळी आणावीत. दोन-चार नावे नंतर आणून देऊ नयेत.
विद्यार्थ्यांची नावे मराठी शिक्षकांनीच मराठीतूनच स्पष्ट व सुंदर अक्षरांत लिहावीत.
परीक्षेची तारीख : शनिवार, दिनांक १३ डिसेंबर, २०२५. ( वेळ स. ९.०० ते दु. १२.०० )
परीक्षा फॉर्म भरण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर, २०२५ राहील.
पुस्तके घेण्याची व संपूर्ण परीक्षा शुल्क भरण्याची वेळ सोमवार ते शुक्रवार सकाळी ११.०० ते ३.०० पर्यंतच राहील. कार्यालयात येण्यापूर्वी शक्य झाल्यास फोन करावा. (महापालिकेच्या शाळांच्या सुट्टीच्या दिवशी तसेच प्रत्येक शनिवारी कार्यालय बंद राहील.)
परीक्षा शुल्क व पुस्तकांची किंमत, सोय व सुरक्षिततेच्या दृष्टीने क्रॉस चेकने भरावी.
संघटनेशी सतत संपर्क ठेवावा व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना मराठी भाषेविषयी गोडी लावण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावा.
कोणत्याही परीक्षांच्या उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांना दाखविण्यात येणार नाहीत, जर उत्तरपत्रिका पाहावयाच्याच असतील तर मुख्याध्यापकांच्या लेखी विनंतीनुसार शिक्षकांच्या समवेत कार्यालयात येऊन पाहण्यास हरकत नाही.