विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी आयोजित आंतरशालेय विविध स्पर्धा शनिवार दि. १३ सप्टेंबर, २०२५ रोजी सकाळी ८.०० ते संध्याकाळी ५.३० या वेळेत काशिनाथ धुरु सभागृह, पहिला मजला, छबिलदास मार्ग, दादर, मुंबई – ४०००२८ या ठिकाणी घेण्यात येतील.
- प्रथमसत्र : “विद्यार्थ्यांसाठी आंतरशालेय विविध स्पर्धा” शनिवार दि. १३ सप्टेंबर, २०२५ रोजी वेळ ८.०० ते ०२.०० या वेळेत होतील.
- द्वितीय सत्र : “शिक्षकांसाठी आयोजित आंतरशालेय वक्तृत्त्व स्पर्धा”. शनिवार दि.१३ सप्टेंबर, २०२५ रोजी दुपारी ३.०० ते ५.०० यावेळेत होतील.
आपण आपल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना तसेच शिक्षकांना या स्पर्धेत भाग घेण्यास प्रोत्साहन देऊन स्पर्धा यशस्वी करण्यास संघटनेस सहकार्य करावे ही विनंती.
आपली नम्र,
सचिव- सौ. मनिषा सदाशिव लेले
कार्यवाह
कार्यकारी समिती
बृहन्मुंबई निम्नस्तर मराठी शिक्षक संघटना.